परिवहन अंदाजपत्रकात ५० नव्या गाड्यांचा प्रस्ताव

सोलापूर, दि.१९ मार्च (हिं. स.) - सोलापूर महापालिका परिवहन सेवेतील बस ताफ्यात नवीन ५० बसगाड्यांचा प्रस्ताव यंदाच्या अंदाजपत्रकात समावेश केला आहे. शिवाय परिवहनच्या अतिरिक्त कर्मचार्‍यांना मनपा सेवेत वर्ग करून आर्थिक बोजा कमी व्हावा, अशी भूमिका घेतली आहे. सभापती मल्लेश बडगू यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली सभा शनिवारी झाली. सत्ताधारी पक्षाने ७० कोटीचे अंदाजपत्रक बहुमताने मंजूर केले. स्थायी समितीनंतर अंतिम मान्यतेसाठी ३१ मार्चच्या सर्वसाधारण सभेत परिवहनचे अंदाजपत्रक येणार आहे.
सन २०१२-१३मध्ये प्रशासनाने उपाययोजना सुचविल्या आहेत. शहरातील काही भागात बससेवा नाही, अशा ठिकाणचे सर्व्हे करून जास्तीत जास्त प्रवासी मिळतील याची खात्री करून सदर भागामध्ये नवीन बसमार्गाचे नियोजन करून बस मार्गस्थ करण्यात येतील. शहरातील सर्व भागातील बसेसचे खेपाचे व वेळेचे नियोजन करून वेळापत्रकाप्रमाणे बसेस धावतील व नागरिकांना वेळेत बससेवा मिळेल. बसेसकरिता लागणारे सुटे भाग, ऑईल, रबरी धागा इ. सामान अधिकृत विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात येईल, ज्यामुळे खर्चात बचत अपेक्षित आहे.
परिवहन उपक्रमाकडे वाहक व चालक सेवक कमी पडल्यास परिवहन समिती सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन कॉंट्रॅक्ट पद्धतीने वाहक व चालक सेवक घेणे, जुने (कंडम) झालेले बसेस व निरुपयोगी सामानाची विक्री करणे, परिवहन उपक्रमाकडील कर्मशाळा, वाहतूक विभाग व अकौंट विभाग व तिकीट विभागाकडील कामकाजाचे संगणकीकृत करण्याची कार्यवाही चालू असून सर्व माहिती संगणकाद्वारे पारदर्शकता करण्यात येईल.फरिीबसभाडे- सन २०१२-१३ मध्ये मार्गावर ११० बसेस धावतील असे ग्राह्य धरून रक्कम रु. १ कोटी ६० लाख ७५ हजार इतकी अपेक्षित उत्पन्न आहे. सोलापूर शहर व शहरालगतचे विद्यार्थ्यांना बसभाडेमध्ये ५०% सवलत देण्यात येत असून इ. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणार्‍या शहर हद्दीतील मुलींना मोफत बससेवा पुरविण्यात येणार असून त्या प्रमाणात परिवहन उपक्रमास महानगरपालिकेकडून वेळेत निधी उपलब्ध होऊन मिळणे आवश्यक आहे.
उत्पन्न- सन २००९ पासून तीन वर्षाकरिता जाहिरातींचा मक्ता देण्यात आलेला होता. सदरची मुदत संपल्याने जाहिरात देऊन पुढील वर्षाकरिता मक्ता निश्‍चित करणेकामी निविदा मागविण्यात येणार असून त्यापासून रु. १८ लाखाचे उत्पन्न मिळेल. निरुपयोगी सामान विक्री- सन २०१२-१३ मध्ये परिवहन उपक्रमाकडील निरुपयोगी सामान व कंडम झालेले बसेसची लिलावाद्वारे विक्री करून रु. १५ लाख इतके उत्पन्न मिळेल अशी तरतूद करण्यात आली आहे. भांडवली जमा- सन २०१२-१३ मध्ये मा. सभापती, परिवहन समिती यांना वापराकरिता नवीन कार खरेदीस रु. ५ लाखाची तरतूद करण्यात आलेली आहे, पण सभापती बडगू यांनी नवीन गाडी नाकारली आहे.
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Monday, March 19, 2012,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS