अर्थसंकल्पावर विश्‍व बँकेचा दवाब - मिश्रा

 सोलापूर, दि.१९ मार्च (हिं. स.) - केंद्र सरकारने सादर केलेल्या अंदाजपत्रकावर विश्‍व बँकेचा दबाव असून नव्या करप्रणालीमुळे व्यापारी आणि सामान्य नागरिकही भरडला जाणार आहे. तसेच जीएसटीची प्रक्रियाही जाचक आहे. याविरोधात अखिल भारतीय उद्योग व्यापारी महासंघ जनजागरण करून केंद्र सरकारला बजेटमध्ये दुरुस्ती करण्यास भाग पाडणार आहे, अन्यथा आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, अशी ग्वाही अ.भा. व्यापार महासंघाचे अध्यक्ष श्यामबिहारी मिश्रा यांनी रविवारी सोलापुरात झालेल्या व्यापारी, उद्योजकांच्या सभेत दिली. तसेच त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप करताना व्यापारी आणि उद्योजकांवर भविष्यात मोठे संकट येण्याची भीतीही व्यक्त केली.
स्मारकात सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने केंद्र सरकारचे बजेट आणि व्यापारी, उद्योजकांवरील संकट याविषयावर श्यामबिहारी मिश्रा यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.
 हिंदुस्थान समाचार/१९.०३.२०१२/अमर पुराणिक/नेहरु वळवी/संजय पुरंदरे
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Monday, March 19, 2012,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS