मराठी भाषा विषयात विज्ञानाचाही वापर हवा

सोलापूर, दि.१९ मार्च (हिं. स.) - माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमाच्या मराठी विषयातील निबंधात विज्ञानाच्या उतार्‍यांचा समावेश व्हावा. विज्ञान उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांच्या गुणांचा ऊहापोह व्हावा, विज्ञानात खर्‍या विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी वाचन व प्रायोगिक साहित्य वाचनात आले पाहिजे व त्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, असा ठराव पहिलेच विज्ञान साहित्य संमेलनात करण्यात आला. मराठी विज्ञान परिषद सोलापूरच्या वतीने गुजराती मंगल कार्यालयात पहिले विज्ञान साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते, त्याचा समारोप रविवारी झाला. यावेळी वरील ठराव मांडण्यात आला. समारोप सत्रास आमदार दिलीप माने, आमदार प्रणिती शिंदे, डॉ. राजा ढेपे, डॉ. नागेश धायगोडे, वैशाली धायगोडे उपस्थित होते.
    मराठी साहित्याचा हा महाराष्ट्रातील पहिलेच विज्ञान संमेलन सोलापुरात झाले. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञान मराठी साहित्यात आले पाहिजे, अशी अपेक्षा आमदार दिलीप माने यांनी व्यक्त केली. संमेलनात युवकांचा सहभाग हा अतिशय कमी असून युवक हाच राष्ट्राचा आधार असून युवकांमध्ये विज्ञानाच्या उपक्रमात वाढविण्यासाठी प्रयत्न व्हावा असे आवाहन आ. प्रणिती शिंदे यांनी केले. यावेळी सहभागी विद्यार्थी प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. डॉ. वळसंगकर, प्रा. धनंजय शहा, अरुण शिखरे, अनिल पाटील, उदय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दुसरे मराठी विज्ञान साहित्य संमेलन वर्धा येथे घेण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.
 विद्यार्थ्यांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तके खरेदी केली. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. अनिल काकोडकर यांच्यावर आधारित पुस्तके स्टॉल मांडण्यात आली होती. समारोप सत्रास क्रांतीवीर महिंद्रकर, सिद्राम पुराणिक, उमाकांत वरेरकर, व्यंकटेश गंभीर, बदामीकर, अंगडी, आराध्ये आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अशोक जडे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. धनंजय शहा यांनी केले.
हिंदुस्थान समाचार/१९.०३.२०१२/अमर पुराणिक/नेहरु वळवी/संजय पुरंदरे

✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Monday, March 19, 2012,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS