आयुक्तांच्या दालनात भाजपाचा ठिय्या
अमरावती - अमरावती महापालिकेच्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्यामुळे मतदार याद्यांच्या दुरुस्तीकरिता दिलेल्या मुदतीत दोन दिवसांची वाढ करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी आ. डॉ. रणजित पाटील यांच्या नेतृत्वात आज भाजपाचे कार्यकर्ते महापालिकेत गेले असता आयुक्त नवीन सोना तेथे उपस्थित नव्हते. त्यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क केल्यानंतरही तेथे येण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला.
जोपर्यंत आयुक्त निवेदन स्वीकारण्यास येत नाही तोपर्यंत आपण येथेच ठिय्या मांडून बसून राहू, अशी भूमिका आ. डॉ. रणजित पाटील यांनी घेतली. शिष्टमंडळाला भेटण्याची वेळ देऊनही आयुक्तांचा वेळेवर येण्यास नकार देणे म्हणजे याद्यांतील घोळाचे हे संपूर्ण प्रकरणच राकॉं व कॉंग्रेसच्या सत्ताधारी मंडळींनी ‘मॅनेज’ केल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांमध्ये उमटत होत्या.
अमरावती महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे मतदार याद्या तयार करण्यात आल्या आहेत. परंतु या याद्यांमध्ये प्रचंड घोळ दिसून येत आहे. विशेष म्हणजे जो घोळ झाला, त्यातून भाजपा-सेना व भीमशक्ती या युतीचेच जास्त नुकसान होण्याची शक्यता दिसून येत आहे. मागील वर्षीचीच पुनरावृत्ती मतदार याद्यांमध्ये दिसून येत आहे. काही ठिकाणी एकाच घरातील २५० मते दाखविण्यात आली आहेत. काही प्रभागांमध्ये मतदार दुसर्या प्रभागातल्या यादीत गेले आहेत. प्रभागांच्या सीमारेषांमध्येच घोळ आहे, असे नव्हे तर काही प्रभागांतील मतदारांची नावे शहराच्या दुसर्या टोकाला असलेल्या प्रभागांमध्ये सुद्धा घुसविण्यात आले आहे. काही प्रभागातील पती-पत्नींचे विभक्तीकरण करण्यात आले आहे. प्रभागातील प्रत्यक्ष मतदार संख्येपेक्षा यादीत समाविष्ट असलेल्या मतदारांची संख्या ५०० ते १००० मतांनी वाढल्याचेही काही ठिकाणी दिसून येत आहे.
मुदत वाढविण्याची मागणी
मतदार याद्यांतील या प्रचंड घोळामुळे शहरातील हजारो मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. एका प्रभागात अडीच ते पाच हजार मतांचा घोळ झालेला दिसून येत आहे. या याद्या केवळ विधानसभेची मतदार यादी पाहून टेबलवर बसूनच बनविण्यात आल्या आहेत. प्रभागाच्या भौगोलिक चतुर्थ सीमारेषेमध्ये राहणार्या मतदारांची नावे त्याच प्रभागामध्ये समाविष्ट केल्यास मतदार याद्यांमधील त्रुटी दूर होऊ शकते. मतदार याद्या प्रभाग रचनेनुसार पुन्हा प्रकाशित करण्याकरिता वेळ लागणार आहे. निवडणूक आयोगामार्फत १७ जानेवारी ही याद्या दुरुस्तीकरिता अंतिम तारीख देण्यात आली होती. या अल्पकालावधीमध्ये याद्या दुरुस्तीचे काम होणे शक्य वाटत नाही. म्हणून याद्या दुरुस्तीचा कालावधी २ ते ४ दिवसांनी आणखी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी महायुतीतर्फे आज डॉ. रणजित पाटील यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक निर्णय अधिकारी तथा मनपा आयुक्त नवीन सोना यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी भाजपा शहर अध्यक्ष डॉ. प्रदीप शिंगोरे, सरचिटणीस अजय सामदेकर व मुन्ना सेवक, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, चेतन गावंडे, सुनील चांडक, ओम चव्हाण, जितू कुरवाने, राज नागतोडे, भारत चिखलकर, अनिल बिजवे, अनिल पुराणिक, सुनील माळोदे, अविनाश चुटके, विजय मानेकर, सुहास गोंगे, अजय सारसकर, सतीश करेसीया, प्रकाश सदार, शैलेंद्र चव्हाण, अजाबराव काजे, कृष्णराव थोरात यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
दहा वर्षांपूर्वीच्या मतदार याद्या
दरम्यान, आयुक्त नवीन सोना तब्बल दोन तास उशिरा आपल्या दालनात दाखल झाले. त्यानंतर महायुतीच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन देऊन नागरिकांच्या समस्या सांगितल्या. यावेळी आयुक्तांनी याद्यात घोळ झाल्याचे कारण सांगितले, ते सुद्धा आश्चर्यचकित करणारे होते. ते म्हणाले की, या याद्यांमध्ये कुठलेही नवीन नाव घेण्यात आले नाही. सन २००१ च्या विधानसभा यादीची नक्कल काढून त्यानुसारच प्रभागनिहाय याद्या तयार करण्यात आल्या. त्यामुळे मागील १० वर्षांत प्रत्येक प्रभागात मतदारांची संख्या वाढणे शक्य आहे, असे सांगून नवीन सोना यांनी उद्या नागपूरला निवडणूक आयोगाच्या विदर्भस्तरीय होणार्या बैठकीत हा मुद्दा आम्ही स्वतः उपस्थित करू, असे आश्वासन दिले. पुरवणी यादीत सुद्धा असाच घोळ असल्याचे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या सर्व याद्या प्रसिद्धीस देण्याच्या मुदतीत दोन दिवसांनी वाढ करावी, अशी मागणीही केली. मात्र आयुक्तांनी सर्व काही उद्याच्या बैठकीवर निश्चित असल्याचे सांगितले. केवळ शहरातील ८३ प्रभागांमध्ये जे ८३० आक्षेप दाखल करण्यात आले, त्यावर चौकशी सुरू असून याबाबतचा निर्णय मात्र लवकर होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महायुतीतर्फे हरकती दाखल
या सर्व घोळाच्या पार्श्वभूमिवर अमरावती शहर भारतीय जनता पक्ष व महायुतीतर्फे प्रत्येक प्रभागातून मतदार याद्यांवर आक्षेप घेणारे अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. भौगोलिक रचना धाब्यावर बसवून अनेक मतदार आपल्या सोईप्रमाणे शेजारच्या प्रभागात पाठवण्याचे काम या याद्यांद्वारे करण्यात आले आहे. सत्ताधारी पक्षाने हा घोळ हेतुपुरस्सरपणे आपल्या फायद्याकरिता केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे भाजपा-शिवसेना तसेच रिपाइंतर्फे या विरोधात प्रभागनिहाय हरकती घेण्यास सुरूवात झाली आहे. याशिवाय एक-एक बोगस मतदार शोधून कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पक्षाने रचलेले षडयंत्र हाणून पाडण्यासाठी महायुती तर्फे शोध मोहिम सुद्धा सुरू करण्यात येत आहे.
आयुक्तांचा खोटारडेपणा उघड
दरम्यान, शिष्टमंडळाला भेटण्यासाठी आयुक्त नवीन सोना यांनी वेळ देऊनही वेळेवर येण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे उपस्थित सर्व कार्यकर्ते चांगलेच संतापले होते. डॉ. रणजित पाटील यांनी आयुक्तांशी फोनवरून चर्चा केली असता ही अतिशय महत्वाच्या कामात असल्यामुळे येऊ शकत नाही, असे कारण आयुक्तांनी सांगितले. त्यावर डॉ. रणजित पाटील म्हणाले की, आपण वेळ दिल्यानुसारच आम्ही येथे आलो आहोत. आपण केवळ ५ मिनिटे आम्हाला द्यावी, आपले येणे जमत नसल्यास आपण जेथे आहात तेथे आम्ही यायला तयार आहोत. याद्वारे आम्ही केवळ आपल्याला मदत करण्याच्याच मानसिकतेत असून आपणाला कुठल्याही अडचणीत आणण्याचा आमचा हेतू नाही, अशा शब्दात आमदारांनी आयुक्त सोना यांना विनवणी केली. परंतु नवीन सोना आपला अडेलतट्टूपणा सोडण्यास तयार नव्हते. मी कोणत्याही स्थितीत येऊ शकत नाही आणि माझ्या स्वीय सहायकाकडून माझे येणे होत नसल्याबद्दल मी आपल्याला आधीच कळविले होते, असे सोना म्हणाले. मात्र, भाजपाच्या कोणत्याही पदाधिकार्यांपर्यंत असा निरोप पोहोचला नव्हता. म्हणून त्याचवेळी आयुक्तांच्या स्वीय सहायकांना बोलावण्यात आले.
स्वीय सहायकांनी आयुक्त आपल्या जवळ असे काहीच बोलले नसल्याचे सांगितले. त्यामुळे आयुक्तांचा खोटारडेपणा सर्व पत्रकारांसमोर उघड पडला. आयुक्त नवीन सोना हे सत्ताधारी पक्षाचे एजंट म्हणून कार्य करीत असून मतदार यादीतला हा घोळ पूर्वनियोजित असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटत होत्या.

No comments:
Post a Comment