नवीन वीज प्रकल्पाचे काम बंद
कोराडी - कोराडी वीज केंद्राचे संच क्र. ५ व ६ सुरू करीत नाही तोपर्यंत नवीन प्रकल्पाचे काम सुरू होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा कंत्राटदार व कामगार कृती समितीने घेतल्याने पोलिस, प्रशासन व प्रकल्पाचे अधिकारी चांगलेच धास्तावले आहेत. आज सकाळी १० वाजता कंत्राटदार व कामगारांनी प्रकल्प कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. यावेळी महाजनको विरोधात जोरदार निदर्शने व नारेबाजी करण्यात आली. दरम्यान प्रकल्पासमोर तासभर तणाव निर्माण झाला होता. ३० आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. सायंकाळी जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. आजही प्रकल्पाचे काम बंद होते.
अटक करणार्यांमध्ये राजेश रंगारी, रत्नदीप रंगारी, सुबोध आवळे, युवराज लिचडे, गजलाल दयामे, सुखदेव सोरते, मनीराम मेहरकर, संजय ठाकरे, कमलेश नागदेवे, अशोक रहागंडाले, नरेंद्र ढेंगरे, महादेव तिडके, मनोज निमजे, श्रावण राऊत, लीलाधर लक्षणे, अशोक खोब्रागडे, धमेंद्र वासनिक, भाऊलाल शेंडे, रमेश वाघाडे, सुबोध आवळे आदींसह महिलांचाही समावेश होता.
७ जानेवारी २०११ रोजी कोराडी येथील १ ते ४ सुरू असलेले संच बंद करण्यात आले होते. यावर्षी ११ जानेवारीच्या शून्य तासापासून संच क्र ५ व ६ बंद करण्यात आले. दोन्ही वेळेस महाजनकोने संच बंद करण्यापूर्वी कामगारांना पूर्वसूचना देणे गरजेचे होते. परंतु महाजनकोने तसे केले नाही. कारखानदारी कायदा १९४८ नुसार महाजनकोने नियमाचे उल्लंघन केले असल्याचा कामगार व कंत्राटदार कृती समितीचा आरोप आहे. मागील वर्षी महाजनको, ऊर्जा मंत्रालय, व्यवस्थापनाने कामगार व कंत्राटदारांची चांगलीच दिशाभूल केली. ३००० कामगार खोट्या आश्वासनांना बळी पडले. यावेळेस कुठलेही आश्वासन चालणार नाही, असा आक्रमक पवित्रा कृती समितीने घेतला. जोपर्यंत संच ५ व ६ सुरू करणार नाही, तोपर्यंत नवीन प्रकल्पाचे काम बंद पाडण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.
काल दि. १७ रोजी प्रकल्पाचे काम दिवसभर बंद होते. यामुळे प्रकल्पाचे काम एक दिवस पुढे ढकलले. शिवाय लाखोंचे नुकसान झाले ते वेगळे. नवीन प्रकल्पाच्या मुख्य महाव्यवस्थापकांनी आज प्रकल्पाचे काम सुरू करण्याकरिता अतिरिक्त पोलिस बोलाविण्याचा इशारा दिला होता. परंतु आंदोलनकर्त्यांच्या भीतीपोटी कामगार कामावर आलेच नाहीत. आले त्यांना परतवून लावण्यात आले. आजही प्रकल्पाचे काम बंद होते.
आज सकाळी ८ वाजतापासूनच कृती समितीचे पदाधिकारी प्रकल्पासमोर ठाण मांडून बसले. १० वाजेपर्यंत ५०० च्या वर कामगार व कंत्राटदार एकत्रित जमा झाले. राजेश रंगारी, रत्नदीप रंगारी, सरपंच विठ्ठल निमोणे यांच्या नेतृत्वात कृती समितीने अर्धनग्न आंदोलन केले. तासभर महाजनकोच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. यामुळे काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली. वातावरण तापू नये याची दक्षता घेत कोराडीचे ठाणेदार प्रभाकर रायते यांनी महिला व पुरुषांसह ३० जणांना अटक केली. सायंकाळी त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. सायंकाळपर्यंत प्रकल्पासमोर कृती समितीचे पदाधिकारी ठाण मांडून होते. कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता प्रकल्पाच्या आत व बाहेरील प्रवेशद्वाराजवळ पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
यावेळी कंत्राटदार जयेंद्र बरडे, श्रीराम कामटकर, सुधीर मांडोकर, रवि लोखंडे, यशोधन भोस्कर, ज्ञानोबा सोनोने, देविदास फुलझेले, बाळू अढाऊ, पी. टी. घारपुरे, लक्ष्मण खापरे, बंडू सोमकुवर, अरुण उजवणे, नागोराव कळबे, करणकुमार, बबलू सोनारे, राजू तांदळे, प्रवीण उगले, अमरदीप हाडके, चंद जनबोधकर, देवा भागवतकर, संतोष गुप्ता आदी कंत्राटदार अर्धनग्न आंदोलनात सहभागी होते. आंदोलनाला जि. प. अध्यक्ष सुरेश भोयर, नाना कंभाले, मदन राजूरकर यांनी पाठिंबा दिला आहे.
अखेर मुंबई बैठकीत काय झाले?
महाजनकोचे व्यवस्थापकीय संचालक व ऊर्जा मंत्री यांची या विषयावर मुंबई येथे चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मात्र बैठकीत नेमके काय घडले, हे मात्र कळू शकले नाही. आंदोलनस्थळी ऊर्जा खात्याशी संबंधित कोणताही वरिष्ठ अधिकारी, मंत्रिमहोदय आदी भेटायला न आल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र रोष आहे.
महाजनको विरोधात आज सामूहिक मुंडन
१९ जानेवारीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत महाजनकोने ठोस निर्णय न घेतल्यास सकाळी १० वाजता कामगार व कंत्राटदार कृती समितीच्या वतीने महाजनको विरोधात सामूहिक मुंडन आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा कृती समितीने दिला.a

No comments:
Post a Comment