अकाली दल-भाजपाचा १४ ला शपथविधी
चंदीगड, (९ मार्च) - सलग दुसर्यांदा स्पष्ट बहुमत प्राप्त करून पंजाबमध्ये इतिहास रचणार्या शिरोमणी अकाली दल आणि भाजपा युतीने आज सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपाल शिवराज पाटील यांच्याकडे औपचारिकपणे दावा सादर केला असून, राज्यपालांनी तो तत्काळ स्वीकारत, शपथविधीसाठी १४ मार्च हा मुहूर्तही ठरविला.
अकाली दल-भाजपाच्या संयुक्त बैठकीत ८५ वर्षीय प्रकाश सिंग बादल यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. बादल राज्यांच्या मुख्यमंत्री पाचव्यांदा आरूढ होत असून, हा देखील एक विक्रमच राहणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अश्विनी शर्मा यांनी बादल यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. अकाली दलाचे प्रदेशाध्यक्ष सुखबिर बादल यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. या बैठकीला भाजपा पंजाब राज्याचे प्रभारी शांता कुमार आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली उपस्थित होते.
या बैठकीनंतर बादल आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ राजभवनात गेले आणि राज्यपालांची भेट घेऊन, सरकार स्थापन करण्याचा दावा केला. त्यांचा दावा स्वीकारत राज्यपालांनी अकाली दल-भाजपा युतीला १४ मार्च रोजी शपथविधी सोहळ्यासाठी राजभवनात निमंत्रित केले.
on - Saturday, March 10, 2012,
Filed under - ठळक बातम्या , राज्य
You can follow any responses to this entry through the RSS 2.0

No comments:
Post a Comment