आदर्श घोटाळ्यात आणखी एक माजी मुख्यमंत्री
सीबीआयची हायकोर्टात माहिती, शिंदे की विलासराव?
मुंबई, - महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आरोपी असलेल्या मुंबईतील कोट्यवधींच्या आदर्श गृहनिर्माण सोसायटी घोटाळ्यात राज्याचा आणखी एक माजी मुख्यमंत्री अडकला आहे. या माजी मुख्यमंत्र्यांचे नाव उघड करण्यास सीबीआयने नकार दिला असला, तरी त्यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सीबीआय सूत्रांनी दिली.
ज्या माजी मुख्यमंत्र्याला आदर्श घोटाळ्यात आरोपी बनविण्यात येणार आहे, ते सध्या केंद्रात मंत्री आहेत, असे स्पष्ट संकेत सूत्रांनी दिले आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेले सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुख हे दोघेही सध्या केंद्रात मंत्री असून, या दोघांचीही सीबीआयने यापूर्वीच चौकशी केली आहे. त्यामुळे, शिंदे की विलासराव, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या माजी मुख्यमंत्र्यासोबत आणखी एक उच्चपदस्थ व्यक्ती या घोटाळ्यात सहभागी असल्याने, या घोटाळ्यातील आरोपींची संख्या आता १४ वरून १६ वर जाणार आहे, असे सीबीआयने सांगितले. सीबीआयने गेल्या जानेवारीत आदर्श घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १४ जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयात याबाबतची माहिती देताना सीबीआयने सांगितले की, एका माजी मुख्यमंत्र्यांसह आणखी दोन आरोपींचे नाव आरोपपत्रात समाविष्ट करण्यात येणार आहे. आगामी दोन महिन्यांत तपास पूर्ण करून सीबीआय आपले आरोपपत्र न्यायालयात सादर करणार आहे.
हा माजी मुख्यमंत्री कोण, याबाबतची माहिती देण्यास नकार देताना सीबीआय सूत्राने सांगितले की, या माजी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यकाळात आदर्शशी संबंधित फाईल हाताळली आहे. त्यांच्याविरुद्ध काही प्राथमिक पुरावे आमच्याकडे उपलब्ध असून, आणखी काही ठोस पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या माजी मुख्यमंत्र्याने नियमांचे उल्लंघन करून आपल्या मर्जीतील लोकांना लाभ मिळवून दिला आहे.

on - Tuesday, March 13, 2012,
Filed under - ठळक बातम्या , महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0

No comments:
Post a Comment