सोनिया गांधींची संपत्ती ४५,००० कोटी

नवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या संपत्ती लपवण्यामागील राज अखेर उघड झाले आहे. अमेरिकेतील एका मीडिया हाऊसच्या दाव्यानुसार सोनिया गांधी या जगातील चौथ्या क्रमांकाच्या धनाढ्य व्यक्ती असून त्यांच्याकडे तब्बल ४५ हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे.
‘बिझनेस इनसायडर’ या अमेरिकन वेबसाईटने जगातील अतिश्रीमंत व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यात सोनियांचे नाव चौथे असून जिंदाल उद्योगसमूहाच्या सावित्री जिंदाल यांचेही नाव आहे. सोनिया गांधी यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे यासंदर्भात नुकतीच माहिती अधिकारांतर्गत केलेल्या विचारणा करण्यात आली होती. सोनियांनी संपत्ती जाहीर करण्यास नकार तर दिलाच, पण या प्रश्‍नामागे कोणते देशहित दडले आहे? असा सवालही केला होता. सोनियांच्या या लपवालपवीचा पर्दाफाश नव्या माहितीने झाला आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना सोनियांनी त्यात आपली एकूण संपत्ती एक कोटी ३८ लाख रुपये असल्याचे नमूद केले होते.
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Tuesday, March 13, 2012,
Filed under - , ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS