कतरीना कॉलीवूडकडे!

‘चिकनी चमेली गर्ल’ कतरीना कैफ आता बॉलीवूडसमवेत कॉलीवूडमध्येही (तामिळ चित्रपटसृष्टी) आपले नशिब अजमावणार आहे. सुपरस्टार रजनीकांतच्या ‘कोच्चादाइयान’ या चित्रपटात कतरीना काम करणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप याविषयी अधिकृत कसलीही  घोषणा करण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी कतरीना कमलहसन समवेतही काम करणार असल्याची चर्चा होती. ‘थलाईवन इरूकिन्द्रन’ हा तामिळ चित्रसृष्टीतील सर्वाधिक महागडा चित्रपट असल्याची चर्चा आहे. हा चित्रपट तेलुगूसह मल्याळम भाषेतही बनवला जाणार आहे. ‘विश्‍वारूपम’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटानंतर कमलहसन ‘थलाईवन इरूकिन्द्रन’ या चित्रपटावर काम करणार आहे.
कबीर खान दिग्दर्शित ‘एक था टायगर’ या चित्रपटात कतरीना सलमान खानसमवेत पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे. हा एक रोमँटिक थ्रिलरपट आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण तुर्कस्थानात झाले. त्यादरम्यान त्या दोघांना तेथे आलेल्या भूकंपाचा अनुभवही घ्यावा लागला. याशिवाय कतरीना यश चोप्रा यांचा एक अनाम चित्रपट तसेच ‘धूम ३’ च्या चित्रिकरणातही भाग घेणार आहे.
कतरीनाने २००३ साली ‘बूम’सारख्या सुपरफ्लॉप चित्रपटातून बॉलीवूडमधील आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती. तेव्हा तिला न हिंदी बोलता येत होते ना तिचा चेहरा भारतीय नायिकेसारखा दिसत होता. त्या चित्रपटात तिने भरपूर अंगप्रदर्शनही केले होते. आज मात्र ती बॉलीवूडची सर्वाधिक यशस्वी नायिका ठरली आहे. तिच्या यशाला मदत केली ती सलमान खानने. मात्र कतरीना या यशाचे श्रेय ती सलमानऐवजी स्वत:च्या मेहनतीला देते. ‘मैंने प्यार क्यू किया’ हा तिचा पहिला यशस्वी चित्रपट होता. ‘नमस्ते लंडन’मुळे तिच्या कारकीर्दीने वेग घेतला. नंतर ‘पार्टनर’, ‘वेलकम’, ‘सिंग इज किंग’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘राजनीती’, ‘जिंदगी न मिलेगी दोबारा’, ‘मेेरे ब्रदर की दुल्हन’ असे अनेक हिट चित्रपट देत गेली. या यशामुळे तिच्या प्रशंसकांची संख्या जशी वाढत आहे तसेच तिच्या अभिनयात सुधारणाही होत आहे. त्यामुळे आगामी ‘एक था टायगर’ देखील हिट चित्रपट असेल, असा अंदाज  व्यक्त होत आहे.
अनेक दिग्गज कलाकारांसमवेत काम करूनही कतरीना बॉलीवूडमध्ये स्वत:ला असुरक्षित समजते. आजही ती अनोळखी व्यक्तीशी बोलत नाही. स्टार बनल्यानंतर भले भले कलाकार बदलतात. पण कतरीना म्हणते की, ‘‘मी आज देखील पूर्वीसारखीच आहे. माझा स्वभाव बिलकुल बदललेला नाही. मी स्वत:विषयी थोडीफार चिंतित असते. आता मी डायट आणि फिगर याची योग्य काळजी घेते.’’
कतरीनाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बरीच चर्चा होत असते. प्रारंभी तिचे नाव सलमान खान समवेत जोडले गेले. नंतर रणबीर व कतरीना  यांच्या अफेअरची चर्चा झाली. सुरुवातीला अशा चर्चा ऐकून तिला त्रास होत असे, पण आता ती त्यातून सावरत आहे. अशा अफवांकडे ती लक्ष देत नाही.
 --------
तरुण भारत, सदाफुली. ७ मार्च २०१२ 
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Tuesday, March 13, 2012,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS