विक्रम पंडित यांना पुन्हा भरघोस पगार
न्यूयॉर्क - तोट्यातील सीटी ग्रूप नफ्यात आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम पंडित यांनी पुन्हा भरघोस पगार घेण्यास सुरवात केली असल्याची वार्ता आहे. २०१० मध्ये त्यांनी केवळ एक अमेरिकी डॉलर पगार घेऊन बोनस नाकारले होते. २०११ मध्ये त्यांचा पगार एक कोटी ४.८६ लाख अमेरिकन डॉलर होता. सिक्युरिटी अँड एक्स्चेंज समितीला प्राप्त माहितीनुसार २०११ यावर्षी विक्रम पंडित यांना १७ लाख अमेरिकन डॉलर इतका पगार मिळाला असून ५३ लाख अमेरिकन डॉलर बोनस व ७८ लाख अमेरिकन डॉलर इतर भत्ते मिळाले आहेत. २००८ मध्ये तोट्यात आलेली बँक नफ्यात आल्यावरच विक्रम पंडित यांनी पगार घेण्यास सुरवात केली आहे. बँकेच्या उत्पन्नात वाढ झाली असली तरी शेअर्सच्या भावात ४४ टक्क्यांनी घट नोंदविण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment