वंदना चव्हाण राष्ट्रवादीच्या उमेदवार

राज्यसभेसाठी सेनेकडून अनिल देसाई  >>   मुंबई - राष्ट्रवादी कॉंगे्रसने आज पक्षाच्या पुणे शाखेच्या अध्यक्षा वंदना चव्हाण यांना येत्या ३० मार्च रोजी होणार्‍या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले. शिवसेनेकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अनिल देसाई यांचे नाव पुढे करण्यात आले आहे.
    राज्य विधान परिषदेच्या माजी आमदार असलेल्या वंदना चव्हाण या पुढील आठवड्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते मदन बाफना यांनी पत्रकारांना दिली.
    राष्ट्रवादी कॉंगे्रस राज्यातून राज्यसभेच्या दोन जागा लढविणार असून, पक्षाचा दुसरा उमेदवार येत्या एक-दोन दिवसांतच ठरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. गोविंदराव आदिक आणि रणजितसिंह मोहिते-पाटील हे राष्ट्रवादीचे दोन सदस्य निवृत्त होत आहेत.
राज्यसभेसाठी सेनेकडून अनिल देसाई
शिवसेनेकडून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अनिल देसाई यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. शिवसेनेने याबाबत कोणतीही औपचारिक घोषणा केलेली नसली तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देसाईंना राज्यसभेची उमेदवारी देण्याचे जवळजवळ निश्‍चित झाले आहे. विशेष म्हणजे शिवसेना पुन्हा मनोहर जोशींनाच राज्यसभेची उमेदवारी देणार की रामदास आठवलेंचे नाव समोर करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. मात्र, या दोन्ही दिग्गजांचा पत्ता साफ करून शिवसेनेने अनिल देसाईंना राज्यसभेची उमेदवारी देण्याचे निश्‍चित केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Thursday, March 15, 2012,
Filed under - , ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS