न्यायमूर्तीचंही प्रशिक्षण हवे - सुजाता मनोहर

औरंगाबाद, दि.१९ मार्च (हिं. स.) - न्यायाच्या क्षेत्रात शॉर्टकटला थारा नाही. न्यायसंस्थेत आणखी सुधारणा घडविण्यासाठी आता न्यायमूर्तींचं प्रशिक्षण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती सुजाता मनोहर यांनी व्यक्त केले. येथील श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर संस्थेच्या वतीने राष्ट्रीय न्याय पुरस्कार सुजाता मनोहर यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्राचार्य नागोराव कुंभार, न्या. प्रसन्न वराळे, वसंत मनोहर, प्राचार्य अनिरूद्ध जाधव आदी उपस्थित होते.
वकीलांनी खोलवर अभ्यास करून बाजू मांडावी, न्यायालयीन कामकाजाचं संगणीकरण व्हावं, अजूनही महिलांवर अत्याचार  होत आहेत त्याला आळा घालण्यासाठी कायदे करण्याची गरज आहे, अशा विविध विषयांवर सुजाता मनोहर यांनी मार्गदर्शन केले. अजय ठक्कर यांनी प्रास्ताविक केले. पुरस्काराची रक्कम सुजाता मनोहर यांनी लातूरमधील पाच सेंवाभावी संस्थाना प्रदान करण्याची घोषणा यावेळी केली.
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Monday, March 19, 2012,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS