सामान्यांसाठी रेल्वे अर्थसंकल्प चांगला- त्रिवेदी
नवी दिल्ली - संसदेत दुपारी बारा वाजता रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी सादर करणार आहेत. यंदाचा अर्थ संकल्प सर्वसामान्यांसाठी चांगला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज दुपारी अर्थसंकल्प सादर होणार असून अर्थसंकल्प सादर करण्यासाठी जाताना रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी पत्रकारांशी बोलत होते. यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प चांगला असून या अर्थसंकल्पामुळे सर्वांच्या चेहर्यावर हसू पाहायला मिळणार आहे. यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात भाड्यात वाढ करण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने सर्वांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत.
on - Wednesday, March 14, 2012,
Filed under - ठळक बातम्या , राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0

No comments:
Post a Comment