अडवाणी करणार दररोज ३०० किलोमीटर यात्रा

पटणा, १० ऑक्टोबर
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा ११ ऑक्टोबरपासून बिहारच्या छपरा जिल्ह्यातील सिताबदियारा येथून सुरू होणार आहे. या यात्रेदरम्यान अडवाणी दररोज ३०० किलोमीटर यात्रा करणार असून दररोज किमान तीन ठिकाणी ते जनसभेला संबोधित करणार आहेत.
अडवाणी यांच्या रथयात्रेला लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जन्मस्थळ सिताबदियारावरून बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार हिरवी कंदिल दाखवणार आहे. भ्रष्टाचाराविरोधात असणार्‍या या रथयात्रेदरम्यान अडवाणी भ्रष्टाचार, महागाई या मुद्यांबरोबरच विदेशात जमा असलेले काळे धन परत आणण्यावर भर देण्यात येणार आहे. अडवाणी आपल्या ४० दिवसांच्या यात्रेत २३ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशातील सुमारे १०० जिल्ह्यांना भेट देणार असल्याचे या यात्रेचे आयोजक रविशंकर प्रसाद यांनी सांगितले आहे.
स्रोत: तरुण भारत, 10/10/2011
✎ Edit Edit

Posted by - Admin,
on - Monday, October 10, 2011,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

No comments:

Post a Comment

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS